संकल्प ..
संकल्प ..
आज परत आठवण आली
डोळे ओले ती करून गेली
तूझं खोटेपणा शर्म ना आली....
आठवण आहे तुझा साथ खोटा
आज मी रडत आहे एकटा एकटा....
तुझ्या माझ्या प्रेमाचे होते सबंध
तुझ्या श्वासातून कोणाचा सुगंध
अगं तुझा रुबाब निघाला चोरटा....
जायचय तर तुला तू निघून जा
मला एकदा शेवटच पाहून जा
तुला मिळवणं आहे माझा तोटा....
तु कोणाला प्रश्न विचारशील
संगमला सोडून तू कशी जगशील
माझं प्रेम गमावून करू नको घाटा....

