संकल्प नववर्षाचा
संकल्प नववर्षाचा
संकल्प नववर्षाचा
काय करावा कळेना
संकल्प सांगण्यासाठी
मार्गदर्शनही मिळेना
कितीतरी जोर लावून
डोके काही पळेना
काही संकल्प ऐकले
पण मन काही वळेना
डायरी लिहा, कविता लिहा
देऊ लागले काही सल्ले
काही म्हणत कथा लिहा
होऊ लागले सल्ल्यांचे हल्ले
संकल्प विचार होता फायद्याचा
पण सल्ले ऐकून झालो Puzzle
केला शेवटी संकल्प एकदाचा
नववर्षात लिहिण्याचा गझल
