संजिवनी
संजिवनी
प्रहार माझा तो बघूनी
शांत होते रे माझी सजनी
तडपते माझ्यासाठी ती पगली.......!
नाव माझे हृदयावरती कोरूनी
रात्र - रात्र जागून काढते
ती माझी प्रिय प्रेयसी.......!
यश मिळविण्यासाठी
जीवनी नतमस्तक होते रे
ती पावलो पावली.......!
दाटून येतात अश्रू तिच्या नयनी
मग करीतो मीच तिची मनधरणी........!
लेवुनी आपल्या प्रेमाचा
टिळा तो कपाळी
अजरामर केलं तिने
आपली प्रेम कहाणी......!
मजला समजून घेताना
वेळोवेळी राग विसरून
प्रेम ठेविते ती हृदयी.........!
वसविले रे तिने मला
आपल्या अंत:करनी
तीच माझ्या प्रेमाची
"मार्शल" संजीवनी........!

