संगीत जीवनाचे
संगीत जीवनाचे
मम जीवनी सखया
येणे तव झंकारुनी
प्रीत फुले बहरता
बावरले मनोमनी
स्वर बारा येता सवे
नाद मधुर झंकारे
हात हाती देऊनिया
प्रीत मधुर हुंकारे
नाथा तुला सर्वस्वचि
अर्पियले मनोभावे
अद्वैताचे भान येता
सूरमयी साज लाभे
राहो अशीच जीवनी
सूरमयी तुझी साथ
सुखदुःख हिंदोळ्यात
झुला झुलेल नभात

