संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा..
संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा..
संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा...
एकटा असला तरी धीराने थोडा थोडा वागत जा..
सोबत नाही कोणी म्हणून,निराशेच्या छायेतून वाचत जा..
जीवनाच्या वाटेवर चालताना संघर्षाला पर्याय नाही म्हणून,
संघर्षाच्या वाटेवर थोडा-थोडा चालत जा.
संघर्षाच्या वाटेवर चालताना तुला बरेच कटू अनुभव येणार
कुणी तुला वेड्यात काढणार तर कुणी तुझ्यावर हसणार
हे सर्व तू थोडं थोडं सहन करत जा
अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा
संघर्षरुपी जीवनात चालताना तुझे ध्येय गाठण्यासाठी,
या सर्वांकडे थोड-थोड दुर्लक्ष करीत जा..
अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा..
संघर्षाची वाट ही नाही कोणासाठी सोपी म्हणून,
या संघर्षाच्या काळातून चालताना
थोडे- थोडे सकारात्मक पाऊल ठेवत जा..
अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा..
विजय तुझाच निश्चित आहे, हे विसरू नको चालत जा..
फक्त थोडा प्रयत्न वाढवून तुझ्या प्रयत्नरुपी परमेश्वरावर विश्वास ठेवत जा..
अन् संघर्षाच्या वाटेवर थोडा थोडा चालत जा..
