STORYMIRROR

SUMIT ATKULWAR

Others

3  

SUMIT ATKULWAR

Others

शब्द हेच खरे किमयागार

शब्द हेच खरे किमयागार

1 min
336

शब्दच करतात प्रहार

आणि शब्दच करतात प्रतिकार

शब्दच आहे जीवनाचे खरे शिल्पकार

शब्दाविना हे जग निराकार

म्हणून शब्द हेच खरे किमायागार


शब्द हेच मित्र

शब्द हेच शत्रू

शब्दांनीच होतो संवाद

आणि शब्दांनीच होतो विवाद

म्हणून शब्द हेच खरे किमयागार


शब्द हीच तलवार

आणि शब्द हीच आहे ढाल

शब्दांनीच पेटतात माणसे, घरदार आणि समाज

शब्दांनीच विजेते माणसांच्या मनांतील आग

म्हणून शब्द हेच खरे किमयागार


शब्द हेच यशाचे मूलमंत्र

शब्द हेच अपयशाचे कारण

शब्द ठरतात आयुष्याचे मार्गदर्शक

आणि शब्दच ठरतात फसवे वाटाडे

शब्द हेच खरे किमयागार


शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ

शब्दांन अभावी त्याच जीवन आहे व्यर्थ

म्हणून शब्द हेच खरे किमयागार


Rate this content
Log in