नवी पहाट...
नवी पहाट...
एकदा पुन्हा नव्याने जीवन चक्र सुरू झाले आहे
एक नवी आशा, नवे विचार आणि नवी पहाट झाली आहे....
कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन
निसर्ग नियमानुसार पुन्हा अनुकूलन करत आहे...
विधात्याने लिहिलेल्या कोरोनारुपी संकटाशी दोन हात करत,
दैनंदिन जीवन जगण्यास लोक कंबर कसून तयार झाले आहे...
मध्यंतरी काही दिवस काळाने जणू जीवनचक्रच स्तब्ध केले,
असे दृश्य आपणास दाखविले आहे....
त्यातूनच मग सर्वत्र दिसत होती ती निराशा,
दुःख, भीती आणि मृत्यूचे भीषण तांडव
परंतु परिवर्तनाच्या निसर्ग नियमानुसार जणू
पुन्हा मानवी जीवनात नवी पहाट आली आहे...
