STORYMIRROR

SUMIT ATKULWAR

Others

3  

SUMIT ATKULWAR

Others

काश! कोरोना नसता तर?

काश! कोरोना नसता तर?

1 min
180

काश! कोरोना नसता तर?

किती छान झाले असते ..

सर्वाना आपल्या मनासारखे जगता आले असते ...

लॉकडाउन, मास्क, सॅनिटायझर, आणि सोशल डिस्टेनसिंग यांनी

त्रस्त असलेले जीवन वाट्याला आलं नसत... 


काश! कोरोना नसता तर?

लोकांची खाण्यापिण्याची कुचंबणा झाली नसती ...

रोजमजुरी करून हातावर आणून

पानावरती खाणाऱ्या गरिबांची 

आबाळ मात्र झाली नसती ...


काश! कोरोना नसता तर?

भविष्य घडवू बघणाऱ्या  

 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक

 नुकसान झाले नसते ..


काश ! कोरोना नसता तर ?

कित्येक मुले आई वडिलांच्या 

प्रेमाला मुकली नसती ...


काश ! कोरोना नसता तर ?

कित्येक लोकांना आपले मित्र, 

नातेवाईक, आप्तेष्टांपासून दूर

होण्याची वेळ आली नसती ...


काश! कोरोना नसता तर?

कित्येक मुलींचे लग्नाचे असलेले 

स्वप्न हे छोटे खाणी औपचारिक    

सभेसारखे उरकले नसते ..

 

काश ! कोरोना नसता तर ?

जागतिक वैफल्यग्रस्त, नैराश्यपूर्ण व 

भययुक्त वातावरण निर्मिती झाली नसती


Rate this content
Log in