साहित्यच देते उत्तर
साहित्यच देते उत्तर
1 min
215
जीवनाच्या वाटेवर चालताना
जीवनाशी दोन हात करताना
जीवनात आलेल्या समस्यांना सोडविण्याचे
साहित्यच देते उत्तर
साहित्यच आपणास दाखविते
अंधकारमय जीवनात प्रकाशवाट
साहित्यच दूर करते वैफल्यग्रस्त जीवन
आणि जीवनास नवचैतन्य देवून
साहित्यच देते उत्तर
जीवन वाटेतील खाचखळग्यांना
जीवनात येणाऱ्या त्या गतिरोधकांना
साहित्यच देते उत्तर
समाजातल्या विषमतेला, जातीयतेला व
भेदाभेदालाही साहित्यच देते उत्तर
देशद्रोही, समाजद्रोही समाजविघातक
प्रवृत्तींना साहित्यच देते उत्तर
मानवजातीच्या संबंध कुप्रवृत्तीला,
कुप्रथेला परखडपणे दाखवुनी आरसा
साहित्यच देते उत्तर!
