Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

संघर्ष

संघर्ष

1 min
238


तळपत्या उन्हात माय डांबरी रस्त्यावर राबत होती 

अनवाणी पायात आगीची ज्वाला धुमसत होती 

डोईवर तिचा लुगडयाचा पदर सावलीसाठी होता 

हिरव्या लिंबाचा पाला पायाला कपड्याने बांधला होता 


पोटच्या बाळाची झोळी बाभळीच्या फांदीला 

दिवसाच्या मजूरीसाठी जीव उन्हात राबला 

मोल होते तुटपुंजे भागे एक दिवसाचे पोट 

दुसर्यादिवशी मजूरीची पहावी लागे वाट 


सूर्यराजाचा भयान गगनात कोप झाला होता 

आगीच्या ज्वाला धरतीवर भयान ओकत होता 

दिवसा चटक्यांनी लाही लाही झाली होती 

तळ्पायाला थंड गारव्याची रात्र सोबत होती 


कष्ट करून अहोरात्र भूक पोटाची मिटत नव्हती  

सणवार,विश्रांती जीवनी कधी मिळतच नव्हती 

 तहाणलेल्या आईला झोपडीची खूप साथ होती 

तप्त डांबरावर पाण्याची तिची तहाण भागवत होती 


 माणूसकीने ओतपोत भरलेली झोपडी होती 

भूकेल्या पोटाला ती नि:स्वार्थ हाक मारत होती 

कष्टकरी जीवनाची विचारपूस करतच होती

तांब्याभर पाणी पाजल्याविना कधी सोडत नव्हती 


धरतीवर जागोजागी बंगले,महाल श्रीमंती आली  

जमीन,जुमले,धन,सोनेनाण्यानी सारी भरली 

अहंकार,गर्व,लोभाने काही जन पछाडली 

माणूसकी सारी त्यांच्या आतल्या आतच दडली 


पाखरे अवती भोवती सतत घिरट्या घालत होती 

तापलेल्या देहाला त्यांच्या भाषेत पाणी मागत होती 

ओसाड रानात झाडेही बोडकी झाली होती 

तिथेच पाखरांची सुंदर घरटी टांगलेली होती 


बाभळीच्या काटेरी फांदीला पाखरांचे खोपे होते 

तप्त उन्हात तेव्हढेच सावलीचा आधार होते 

चिल्यापिल्यांच्या जीवासाठी रानोरानी भटकत होती 

चोचीत चारापाणी चोचीने मायेने भरवत होती 


मायचे जीवन पाखरांचे जणू कष्टकरी जगणं 

त्यांचा आदर्श जपला त्यांच्या थोर शिकवणीतून 

त्यांच्या कष्टाची हाक आळशी जीवन हद्दपार 

त्यांच्यासारखे जगावे माया, ममतेचे भांडार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational