STORYMIRROR

Vimal Patkari

Romance

4  

Vimal Patkari

Romance

स्नेहदीप तू माझा !!

स्नेहदीप तू माझा !!

1 min
417

स्पंदने ही अंतरिची कंप का रे पावती

श्वास देण्या प्रितीचा येई सखया झडकरी 


प्रभातिची घेवून लाली

लाजलाजली सृष्टी सारी

मम जीवनी रंग भरण्या

प्रणयछटा ये होवुनी !!


दिनकर तळपून मध्यांन्ही

करी जीवाची लाही-लाही

गारवा देण्या सखया येई

शितल प्रभंजन होवुनी !!


रवी हा लगबग अस्तास जाता

खुणवी पाहुनी व्याकूळ मजला

सांजकाळी सखया येई

स्नेहदीप रे होवुनी !!


रजनीचा अंध:कार पाहून 

मनात का उठते काहूर

घालण्या अंतरी प्रीत साद तू

येई सखया निशानाथ होवुनी !! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance