समतोल
समतोल
आयुष्याचं महत्त्व कळायला कोरोनाच यायला हवा का?
माणसाची किंमत कळायला जीवच जायला हवा का?
असाही देता येतो आदर आपले स्वत्व राखून,
काही क्षण फक्त स्वतःसाठीचे नात्यात लक्ष्मणरेषा आखून.
कुठे अतिकाळजी-अतिप्रेम,
कुठे एकमेकांसाठीही वेळ जेमतेम.
काहीही अती झालं की बिघडतोच समतोल,
माणूस असो की वस्तू राहात नाही त्यांचं मोल!
