समतेच्या शोधात
समतेच्या शोधात
गाजवतात सत्ता मूठभर लोक;
दिसे सर्वत्र वखवख चंगळवादींची.
समतेच्या शोधात फिरत आहे आज;
आदर्श मूल्यमापने मानदंडांची..!!१!!
विसरला माणूस माणसावरचे प्रेम;
सामाजिक, आर्थिक, समतेचे, भान.
सुरू झाली जीवनमूल्यांची फारकता;
अहंकार येई आडवा देण्यास मान..!!२!!
निसर्ग दाखवे मनुष्यातील विषमता;
शारीरिक, बौद्धिक, मानसिक दृष्ट्या.
शिकवण साधुसंतांची 'सर्वांभूती परमेश्वर';
अवलंबावी लक्षणे स्थितप्रज्ञाची समदृष्ट्या..!!३!!
लक्षात न घेता संपत्ती, जात ,धर्म, वर्ण;
सामाजिक समानता जोपासावे.
देऊन समान संधी सर्व नागरिकांना;
राजकीय समतेचे पालन करावे..!!४!!
समतेच्या शोधात पहावे जरा शाळेत;
इथेच येते लक्षात भेदभाव, विषमता.
अंतर मिटवण्यास सज्ज न्यायव्यवस्था;
शिकवावे लहानांना संस्कार मूल्यांची समानता..!!५!!
