स्मशानभूमी.....
स्मशानभूमी.....
जगातील शेवटचं सत्य मरणच असत
मरणाचं घर सुद्धा स्मशानभूमीच असत
गरीब असो श्रीमंत शेवटी तिथच जायच अस
संपुर्ण आयुष्य गेलं त्याच चिंता करण्यात वाया
मेल्यावर मी बघितलं त्याच्या चिंताची चिता बया
म्हणून म्हणते नको करू तू गर्व.....||ध्रु||...
जगातील शेवटचं सत्य मरणच असत
आयुष्यात त्याने चार माणसे कमावली असती
तर शेवटच्या वेळी तिचं कामी आली असती
आपलं आपलं करता करता
शेवटची आंघोळ सुद्धा परकाच घालतो
म्हणून म्हणते नको करू तू गर्व....||१||...
जगातील शेवटचं सत्य मरणच असत
पैसा कमवा साठी करतो दिवसाची रात्र
पैसा मिळाला की सुखासाठी ना राही तू पात्र
तिथे ना राही गरीबी आणि श्रीमंती
दोघे ही जळती एकाच स्मशानभूमी वरती
म्हणून म्हणते नको करू तु गर्व....||२||.....
जगातील शेवटचं सत्य मरणच असत
माझे माझे करीत या जगात आले
कुणी ना तुझे राहिले, स्वप्नांची होळी झाली
आज तुझ्याच लोकांनी चिता तुझी जाळली
जन्माला आला खाली हाती, मेल्यावर
जायच आहे स्मशानभूमीच्या मातीत
म्हणून म्हणते नको करू तु गर्व....||३||...
