स्मृतीचा पारवा
स्मृतीचा पारवा
आला थंडीचा महिना
झोंबे अंगाला गारवा
सखे हृदयी घुमतो
तुझ्या स्मृतीचा पारवा
तुझी आठवण येता
जीव होतो कासावीस
अंगा झोंबतो गारवा
वाटे बाहूत यावीस
तुझ्या प्रीतीचा पाऊस
माझ्या अंगाला झटतो
तुझ्या स्मृतीचा गारवा
हवा हवासा वाटतो
अंग तुझं मऊमऊ
जशी कोवळी काकडी
गारव्यात फिरू नको
सखे होशील वाकडी
गारव्याचा त्रास सखे
तुझ्या होईल अंगाला
सुखी ठेव माझी सखी
हेच मागणं देवाला

