STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Tragedy Others

3  

कुमार भयकथासूर

Tragedy Others

समाजाने टाकलेली बाई

समाजाने टाकलेली बाई

1 min
218

मुलाच्या हव्यासा पोटी दिला होता मला जन्म 

माहित नाही काय असेल पुढे माझे कर्म 


जन्माला येऊन केली मी साऱ्याची निराशा 

माझी आई होती खुश होती तिच्या डोळ्यात आशा 


मोठी होऊ लागली घरात नव्हते कोणते स्थान 

केली नाही अपेक्षा देतील मला घरात मान 


गेलि आई माझी देवान् नेल तिला हिरावून 

तिच्या जाण्याने माझं जग गेले हरवून 


बापाने दारू पाई केला माझा सौदा 

माझे वय कोवळे होते फक्त चौदा 


नेले मला शहरात टाकले कुटनखान्यत विकून 

माझे सारे आयुष जाणार इकडे फुकून 


रोज होतात माझ्यावर नव नवे अत्याचार 

शरीर सोसते रोज होणारे बलात्कार 


असे माझे जीवन झाले आहे नरक 

ज्याने बाहेर कोणाला नाही पडत फरक 


कालंतराने निसर्गाने आपले चक्र फिरवले 

मला सुद्धा गरोदर बनवले 


होणाऱ्या बाळाला काय सांगु कोण आहे तुझा बाप 

माझ्या पोटात वाढणारे आहेत तु कोणाचे पाप


जन्माला आली एक निरागस पोर 

तिला पाहून पुन्हा लागला जीवाला घोर 


ठरवले तिला ठेवणार नरकापासुन दूर 

माया आणि प्रेम देणार तिला भरपूर 


करणार तिची जे आहेत ती सर्व स्वप्न पूर्ण 

नाही ठेवणार अशी जशी माझी राहिली अपूर्ण 


तिच्या साठी बनणार मी एक उत्तम आई 

तिला काही कमी पडू देणार नाही ही समाजान टाकलेली बाई ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy