STORYMIRROR

Pooja Yadavrao Bhange

Tragedy

3  

Pooja Yadavrao Bhange

Tragedy

"समाधान कशात असते".......!!!

"समाधान कशात असते".......!!!

1 min
1.0K

पैशाने पूर्ण झालेली स्वप्न श्रीमंत बनवू शकले तरीही

कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न हे - इतिहास घडवतात

घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा

कारण जग हे एक बाजार आहे

पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा 


कारण तेथे एक कुटुंब आहे

कुणाच्या नशिबाला हसू नये

कारण नशिब कुणी विकत घेत नाही

वेळेचे नेहमी भान ठेवा

कारण, वाईट वेळ कधीच सांगून येत नाही


कुणी कितीही चालाख असले तरी

नशिबाशिवाय जिंकता येत नाही

बिरबल खूपच चतुर होता तरीही

राजा होऊ शकला नाही

समाधान ही सर्वांत मोठी अन् 

सुंदर संपत्ती आहे


ज्याला ही संपत्ती मिळाली तो

जगातला सर्वांत सुखी मनुष्य !

कपडे नाही

माणसांचे विचार Branded पाहिजे

चूकीच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा

एकटं उभं राहणे हे 

कधीही चांगले.....


अशा व्यक्तींवर विश्वास ठेवावे

जे आपल्या अंतःकरणातील‌ 

हे तीन गोष्टी ओळखेल

हसण्यामागील - दुःख ,

रागावण्यामागचा - प्रेेम आणि

शांत राहण्याचे - कारण !

अशाप्रकारचे व्यक्ती ज्यांच्या जिवनात असते 

तो या पृथ्वीवरील सर्वांत सुखी मनुष्य !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy