!! नाते हे प्रेमाचे !!
!! नाते हे प्रेमाचे !!
1 min
453
कशी मी जाऊ आई दूर सासरा,
खुप आठवण येईल गं तुझी मला...
सांग ना आई करमेल का माझ्याविना,
क्षण ही जात नाही गं तुझ्याविना...
दररोज आठवणीत तुझ्या मी राहणार गं,
रात्रीच्या स्वप्नांत माझ्या तूच येणार गं...
काहीच अर्थ नाही गं आईविना,
जीवन हा व्यर्थ जाईल गं तुझ्याविना...
कधीच नाही जाणार तुझ्याशी दुर गं,
तुझ्याच प्रेमळ , गोड मिठीत मी राहणार गं !
