दोष कुणाला द्यायचे?
दोष कुणाला द्यायचे?
भावा-भावांच्या भांडणामध्ये
आईच हृदय धडधडतंय,
तुझ-माझं म्हणता म्हणता
सगळं अंधार पसरतेय...
अवचीट पिढी लहान असून
संस्कार पूर्ण विसरतेय,
लहान-मोठ्यांचा भान विसरून
जिभ वाकडी वळवतेय...
सासू-सूनांचे प्रेमळ दृश्य
मी स्वत: जवळून अनुभवले,
डोळयांमधले अश्रू पाहून
हृदय माझ कळकळलंय...
चूक कुणाची समजले तरी
बाजू कुणाची घ्यायची !
दोघेजनही आपलेच असताना
दोष 'कुणाला' दयायचे ?
- कवयित्री : पुजा यादवराव भनगे.