सलाम महाराष्ट्राला
सलाम महाराष्ट्राला
सलाम महाराष्ट्र भाषिकाला
मातृभूमीच्या मराठी प्रांताला
महाराष्ट्राच्या महान संस्कृतीला
साधूसंतांच्या चरण स्पर्शाला
क्रांतीकारक,हुतात्मे वीरांला
महाराष्ट्राच्या अमर इतिहासाला
संस्कृतीच्या माहेर घराला
रक्तरंजित बलिदान महाराष्ट्राला
महाराष्ट्राच्या नव निर्मिती लढ्याला
महापुरुषांची शिकवण महाराष्ट्राला
साधू संतांचे अध्यात्म संस्काराला
महाराष्ट्र मातीला,महाराष्ट्र भूमीला
ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राला
अथांग सागर रक्षणा महाराष्ट्राला
डोंगर रांगा,किल्ले साक्षीला
तुडूंब नद्या महाराष्ट्राला
निसर्गाच्या नंदन वनाला
महाराष्ट्राच्या प्रबोधनाला,विश्वशांतीला
जागतिक खेळाडूंच्या विक्रमाला
बुद्धिवंत,शास्रज्ञ,विद्वान महाराष्ट्राला
शिल्पकार,कलेच्या महाराष्ट्राला
परिवर्तनवादी भूषण महाराष्ट्राला
वारकरी संप्रदाय एकात्मतेला
समता,ममता देणार्या राज्याला
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला
शाहू,फुले,आंबेडकर चळवळीला
प्रगतीच्या समृद्ध महाराष्ट्राला
संतांच्या महान विचाराला
महाराष्ट्र प्रबोधन करण्याला
