सख्या प्रीतझुला दे रे
सख्या प्रीतझुला दे रे
प्रीतीचा मयूरपिसारा हा तुझा
मनाला बेधुंद करूनी मोहवतो रे
मिठीत घेतांना सख्या बघ माझे
अंग अंग शहारते रे
किती बावरले तुला पाहून
लाजली मोहरली प्रेमलता सख्या रे
येण्या जीवनी तुझ्या बघ माझी
किती माझी तळमळ रे
बंध हे प्रेमाचे, झंकृत हृदयाचे
अलगद अलवार धरले रे
मधुचंद्रासम वाटे मज
रोजचं ही रेशमी रात्र रे
बांधल्या जेव्हा रेशीम गाठी
किती सुखावले मी मनी रे
झुलते मी प्रीतीच्या हिंदोळ्यावर
सख्या प्रीतझुला दे रे
मृदंग वाजे अंतरी
विणेची तू साथ रे
सप्तरंग इंद्रधनुष्य
श्रावणाची ती प्रीत रे
नाही मागणं कुठलंही
सौभाग्यचं तू कुंकू रे
उधळीत मधूरम विश्वासाचे घट्ट
सुखी संसाराची तू फुलवात रे

