STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सखी

सखी

1 min
212

संवेदनशील सखी

नववर्ष पदार्पण

लाभो दीर्घ आयुरारोग्य

लाभो मनोवांछन


नवनवी क्षेत्रे लीलया

केलीस तू पादाक्रांत

 वारा गर्वाचा न कधी 

शिरला मस्तकात


पाय जमिनीवरीच

सदासर्वदा ठेविले

नित्य स्तुतीसुमनांना

कसे विनयाने झेलले!!


महद् भाग्यानेच मम

सखी सहवास लाभे

सर्वगुणसंपन्न शिल्प

प्रभू परमेश्वर घडवे


इथूनी दृष्ट काढते

सदा राहो स्मितवदन

आशिर्वच परमेशाचे

लाभो आनंदी जीवन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract