सकारात्मक विचार !!
सकारात्मक विचार !!
नकारात्मकतेने खुप छळलं ,
जगण्याचं रूप बदलून टाकलं ......
निराश मन अगदीच खचलं ,
जगण्याची उमेद गमावून बसलं ......
घडणारं हे योग्य नव्हतं ,
बदल घडवणे क्रमप्राप्त होतं ....
हतबल जगणं मान्य नव्हतं ,
जन्माचं सार्थक करायचं होतं ....
नैराश्येला उधळून लावलं ,
जगण्याचं तंत्र बदलून घेतलं ....
जे मिळेल ते स्वीकारलं ,
मागे वळून बघणेच टाळलं ......
फक्त वर्तमान जगत राहिलो ,
सकारात्मक जगणं शिकत गेलो ....
घडेल त्याला सामोरं गेलो ,
आदर्श म्हणून नावारुपाला आलो !!