STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

सजणी

सजणी

1 min
135

मुखडा नयनी भरला सजणी

नजरेत गुन्हा घडला सजणी


बहरून वसंत तुला बघतो 

बघ प्रेमऋतू फुलला सजणी


गझलेमधला मिसरा बन तू 

मग शेर पहा जमला सजणी


हळुवार पहा इथल्या गमती 

मुलगा हसरा रडला सजणी


बघ न्याय इथे दिसतो उलटा

गुणवान कसा हरला सजणी 


उलटे करता सुलटे घडले 

गमतीत गळा कटला सजणी 


रडता रडता दिनही ढळला

रुसवा फुगवा कसला सजणी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance