सजा
सजा
जमले सारे मजा बघायला
उरले सारे सजा भोगायला
शिक्षा बघा चाबूक हाती
भयानक भीती मनात वाहती
पाठोपाठ एक अंदाज बांधती
उभी एक तलवार टांगती
भोग नशिबाचा भोगण्यास जाई
उभारायची जागा भासते खाई
आकडे ते कसले वस्त्रांवरचे
अडकले मन अतृप्त वासांचे
चार गज धगधत्या ठिणग्या
उडवी मज असुर्या फांद्या
