STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

1  

Gayatri Sonaje

Tragedy

श्वासाचे अत्तर

श्वासाचे अत्तर

1 min
441

श्वासाचे अत्तर

तुझला वाहिले

कळले मजला

सर्वस्व संपले....


येशील मागुती

मनाला वाटले

तुझविण सारे

आभाळ फाटले....


आधार कुणाचा

जगी न उरला

मार्गात काटेरी

पुरच भरला....


तुझ्यासवे आता

रिते झाले क्षण

हृदयात साठवे

स्नेहाचे ते धन....


भोगायला काही

आयुष्यच नाही

तुझ्याविण आता

शब्दांतच राही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy