STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

शुक्रवार सुप्रभात किती छान..!

शुक्रवार सुप्रभात किती छान..!

1 min
255

शुक्रवार सुप्रभात किती छान...!

शु क्राची चांदणी गायब झाली

क्र मा क्रमाने अफवा झिरपत झिरपत

वा ट काढत काढत माझ्या पर्यंत आली..

र डगाणं नेहमीचंच म्हणून मी

सु रवातीला काना डोळा केला

प्र संगावधान राखून मागोवा घेतला...

भा ग्य काळवंडले की काय म्हणून

त सदी घ्यायचे ठरवले आणि

कि ल किली नजर थोडी बारीक केली...

ति चा शोध घ्यायचा संकल्प सोडला

छा न पैकी अंग मोडूनआळस झटकला

न कळत तिला शेजारीच पाहून

  खाडकन जाग येता जीव भांड्यात पडला ...!

  म्हंटल बरं झालं

  उजडायच्या आत माझे डोळे उघडले

   शोध मोहीम फत्ते होता

   सकाळी सकाळी

   गरम चहाने चटकन जीभ भाजली...!

शुक्रवार सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational