श्रीमामाजी
श्रीमामाजी
महाराष्ट्राच्या नकाशावर
वांबोरी एक गाव
तेथे असती महान्योगी
पु.श्रीमामाजी त्यांचे नाव
मामाश्रींचा सहवास आहे
सुंदर एक बगीचा
निरनिराळ्या बहरलेल्या
सुगंधित पुष्पांचा
जाई,जुई,गुलाब,कण्हेरी
चाफा,चमेली व मोगरा
सुगंध दुरवर पसरी
बहरुन जाई वसुंधरा
भारावले पुर्व क्षितिजावर
चंद्र आणि शुक्र चांदणे
मुखावरील प्रसन्न मनोहर
झळाळत्या तेजाने
परिपुर्ण असा ज्ञानसागर
ओथंबला वात्सल्याने
साहित्यरत्नांचे आगर
अनुभविले प्रसादानुजने
