जीवलग
जीवलग
मुक्त भावनेचा वारु चौखुर उधळतो
आपुलकीचा सुगंधी मोगराही फुलतो
निस्वार्थ,निस्सिम सदा प्रेमझरा वाहतो
जीव जडतो जेथे तो जीवलग असतो
न दिसता कुठे तो कासावीस होई मन
हक्काने करुनी त्रस्त ठरलेले भांडण
रुसवा,फुगवा विसरुनी पुन्हा मिलन
जीव जडतो जेथे तो जीवलग असतो.
प्राणापरी प्रिय जीव हा त्याच्यात गुंततो
मित्र-मैत्रीणी,बहीण-भाऊ कुणीही असतो
माता-पिता, छंद,ध्येयात हा गुरफटतो
जीव जडतो जेथे तो जीवलग असतो.