श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
!!१!!श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ!!१!!
!!२!!दत्त साक्षात अवतार
श्री क्षेत्र गाणगापूर!!२!!
!!३!!स्वामींचे नाम घेता मुखी
अवघा संसार हा सुखी!!३!!
!!४!!तुमच्या चरणाशी स्वामी
चाफा फुल वाहतो मी!!४!!
!!५!!ध्यानी मज स्वामी
मनी नित्य सदा स्वामी!!५!!
!!६!!प्रहरी तुमची आरती
ध्यानस्थ करुनी भक्ती!!६!!
!!७!!माझे मन दर्शनास
भेटी लागी आता आस!!७!!
!!८!!श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ!!८!!