STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

मुराबाजी देशपांडे

मुराबाजी देशपांडे

1 min
30

जावळीच्या खोऱ्यात

हिरा बघा गवसला

चंद्रराव पळाला पण 

योद्धा मुरारबाजी भेटला


पिळदार याच्या मिष्या 

आणि भेदक नजर 

अंग धाडधिप्पाड

युद्धाला हा जबर 


मनी भरोसा मोठा

पुरंदर हाती सोपवला

शिवरायांचा हा मावळा

झुंज देऊन पडला 


मुघलांनी फास आवळला 

पुरंदरला वेढा टाकला 

हा बाजी एकटा उभा

खरा शर्तीने लढला


अवघे सातशे मावळे 

सोबतीस घेऊन

पाच हजार शत्रूंची 

उडवली दाणादाण  


शरीर रक्ताने माखलेले 

शीर धडावेगळे उडून 

लढला शेवटच्या श्वासापर्यंत

हे बघून शत्रूही झाले हैराण 


लालच दिलेरखानने दिली

"जहागिरी देतो तुला "

कौल मी घेणार तुझा व्हय 

आरं मी तर शिवबाचा मावला 


हा लढायला तिखट

शिवरायांच्या शब्दाखातर

दुश्मनांना कापला सपासप 

धारातीर्थ पडला पुरंदरवर


Rate this content
Log in