STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

2  

Sangita Pawar

Inspirational

श्री गुरुदत्त

श्री गुरुदत्त

1 min
18

मार्गशीर्ष पौर्णिमेला

दिन दत्तजयंतीचा

सेवा श्री स्वामीसमर्था

जप श्री गुरूदत्तांचा||


ब्रह्मा-विष्णू-महेशही

तीन मुखीच दैवत

चार श्वान दिमतीला

गुरु गायही मानीत||


असे 'श्रीपाद वल्लभ'

पहिलाच अवतारा

'श्रीनृसिंह सरस्वती'

असे स्थानीही दुसरा||


'माणिकप्रभूही'असे

तृतीयाही अवतार

'स्वामी समर्था' दिसती

चौथा दत्त अवतार||


अत्रि ऋषींनी पर्वता

तपश्चर्या केली घोर

पुत्र जन्मे गुरुदत्त

श्रीनिवास गांगापूर||


गुरुस्थानी सकलांच्या

अवधूत चिंतन दिसला

हाती कमंडलू ताटी

दत्त गुरूही भेटला||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational