STORYMIRROR

Shivam Madrewar

Inspirational

3  

Shivam Madrewar

Inspirational

डोळ्यातील आभाळ

डोळ्यातील आभाळ

1 min
820

डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

या धरती मातेला हिरवळीमध्ये बदलावे,

संपूर्ण आकाश आपल्याच ताब्यात घ्यावे,

अन् त्या चंद्रालादेखील स्वत:च्या प्रेमात पाडावे


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

सोसाट्याच्या वाऱ्याने संपूर्ण क्रोध वाहुनी न्यावे,

पक्ष्यांसारखे स्वतंत्रपणे आकाशात भटकावे,

अन् या धरती मातेला वर्षाने समृद्ध करावे


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

आपल्या जादुने इंद्रधनू आभाळात दाखवावे,

सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणेच आयुष्य रंगवावे,

अन् विजांच्या कडकडाटेने आनंदाचे गीत गावे


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

पसरता पसरता अंधाराला बोलवावे,

मावळत्या सुर्याने सर्व दु:ख संपवावे,

अन् उगवत्या सुर्याने संपूर्ण जग


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

जसे निर्सगाच्या हिरवळीमघ्ये भटकावे,

या आभाळासोबत अवकाशात हरवावे,

अन् डोळ्यातील आभाळाने आनंद बरसावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational