श्रावणमेघ
श्रावणमेघ
घननीळा श्रावणमेघ
करी तृप्त तनमनास
शहारतो तप्त ह्रदयास
न उरले भान क्षणास...
ती अवचित नक्षी मेघातं
प्रकाशते घनांत अवचितं
पाहते खेळ हा रोजं
ती श्रावणसंध्या निवांतं..
घन गर्जुन येती क्षणातं
काळोख दाटतो मिट्ट
मी बावरून पहात राही
संध्येचा रंग घनगर्द...
कोसळती श्रावणधारा
संतत अवनीवरती
दिशा धूंदही दाही
कृष्णमेघ पांघरती...
धरती श्यामला अवघी
तृप्त पिऊनी धारा
झाला सोहळा सुखाचा
मी चिंब लपेटून शेला....

