श्रावण
श्रावण
रिमझिम पावसाची बरसात.
आला आला श्रावण मास.
अंगणात ही बिलोरी आरास.
त्यात माझे घर जणू स्वर्गाचा भास.
पानांवर ताऱ्याची रांगोळी छान,
पाहताच विसरून गेले देहभान
सृष्टीची किमया पाहून मी हसली.
निसर्गाची कृपादृष्टी ती बरसली.
रोमांचित झाला जणू ही वसुंधरा,
सजला अंगणात मोत्यांचा साज.
ओंजळीत झेलून बेधुंद नाचले आज.
बालपणात जावून विसरून सारी लाज.
हिरव्या फांदीवर पहा डोलत हसली.
हिऱ्या माणकांची माळ ही रचली.
तारागंणने धरणी लाजवून मोहरली.
अंगणात माझ्या लाजत मुरडत बसली.
आकाशातून आलीस धरती,
पांघरून धुक्याच्या शालूत तू.
पानांवर चमकलीस पागोळ्या बनून,
जणू शालूत झगमगीत बिलोरी आरसे तू.
