STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
112

खुशाल या श्रावण सरींनो

न्हाऊ घाला ह्या धरेला

अधीर झाली भेटण्या वरूणदेवा

तृप्त करा तिच्या तनामनाला

पहुडलेल्या त्या बीजांना

अंकुर कोवळी फुटली

हिरवी हिरवी वसुंधरा

नवरी होऊन नटली

किलबिलणाऱ्या पक्ष्यांची

झाली अंघोळ छान

चमचम करती मोती

सजली रांगोळीचे पान 

क्षणात ऊन,क्षणात सावली

दृश्य मनोहर भासे

निरभ्र आकाशी या

सजले इंद्रधनू कसे

करुनी साज सुंदर

नटली ही अवनी

नववधू प्रिया जणू

अधीर झाली मनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract