श्रावण आणि पाऊस
श्रावण आणि पाऊस


माझ्या बालपणीचा गं
होता श्रावण वेगळा!
नागपंचमीचा झोका,
मेहंदी आणि नवा चूडा!
तरूणपणीचा कसा
श्रावण नवा-नवा वेगळा!
त्याच्या येण्याची वाट भिजत
बघतसे जीव कावरा-बावरा!
लग्न झाले आणि आले सौभाग्य जीवनी
मंगळागौर, सण, माहेरवास
भासे श्रावण वेगळा, जणू सोहळा
असा श्रावण जीवनी वेगळा-वेगळा!
श्रावणात सृष्टी कशी, नटते सजते
लेते पैठणी शालू हिरवागार,
उतारवयात श्रावणाचा रंग वेगळा
पाऊस आणि गोड धोड, सोसेना गारवा!