शोधून सापडत का प्रेम?
शोधून सापडत का प्रेम?
शोधून शोधून थकलो आता
कुठे भेटत कळेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?
असंख्य माणसांच्या गर्दीत
खरं प्रेम शोधायला जमेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?
कोणत्या रूपात, कोणत्या ठिकाणी
भेटेल ते समजेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?
हारून शुष्क झालेल्या हृदयाला
प्रेमाचा वर्षाऋतू मिळेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?
शांत निजलेल्या स्पंदनांना
प्रेमाची चाहूल भेरेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?
कोमेजलेल्या ह्या हृदयाची
प्रेमकळी फुलवेल का?
हवंहवसं वाटणार प्रेम
शोधून सापडेल का?

