शोध नव्या प्रकाशाचा...
शोध नव्या प्रकाशाचा...
चला शोधू उमेदीला
आला दिवस नववर्षाचा
दिस उगवला असा
जसा ध्येय पूर्तीचा ||१||
स्विकारली आव्हाने
ध्येय गाठण्यासाठी
धडपडलो अमाप
सुखाच्या शोधासाठी ||२||
पेलली सारी आव्हाने
केला निश्चय ध्येयाचा
निघालो मी असा हा
शोध घेण्या सुखाचा ||३||
मिळती बळ असे
नव्या संकल्पनेतून
चला शोध घेऊ जगाचा
नव्या विचारातून ||४||
मिळती नवे विचार
नव्या विचारसरणीने
घेऊनी आधार शब्दांचा
शोधू जग कवितेने ||५||