शोध अस्तित्वाचा
शोध अस्तित्वाचा
माझ्या अस्तित्वाची जाण
ही माझी मलाच असावी
इतरांच्या नजरेतील
तुलनेची झलकही नसावी
माझ्या आवडी माझे छंद
माझ्या अस्तित्वाचा आरसा
मीच जपेन माझ्या साठी
मंगलमय माझा वारसा
माझेच श्वास पुरवीन
अस्तित्वाच्या जगण्यासाठी
देईन लढा मी आजन्म
अस्तित्वाच्या शोधासाठी
मरणयातना सोसल्याय
भरभरून जगण्यासाठी
कितीही मरमर माझी
माझ्याच अस्तित्वासाठी
काटेरी पाने आयुष्याची
रक्तबंबाळ करती मजला
तरीही अस्तित्वाचा भाव
माझ्या अंतरंगी सजला
