शिवस्तुती
शिवस्तुती
महादेव शंभुनाथ
भुतनाथ ब्रम्हचारी |
आहे तूच गंगाधर
जटाचंद्र भस्मधारी ||१||
जटाचंद्र भस्मधारी
कैलासात तुझा राज |
हलाहल प्राशनाने
झाले कंठी निळा साज ||२||
झाले कंठी निळा साज
प्रभू व्याघ्रांबरधारी |
खुले मस्तकी त्रिनेत्र
स्वामी त्रिपुरांतकारी ||३||
स्वामी त्रिपुरांतकारी
आहे शिव शुलपानी |
राहतसे समाधिस्थ
होई निज बोधवानी ||४||
होई निज बोधवानी
जपा पंचाक्षरी माला |
सांगतसे गोवर्धन
हात जोडून जनाला ||५||
