शिर्षक :- " स्त्रीची विविध रुपे"
शिर्षक :- " स्त्रीची विविध रुपे"
नऊ महिने उदरात, सोसिले जिने कष्ट अपार,
मातेस त्या करुनी नमन...,
साजरा करु प्रथम दिन.....।।
घेऊनी सात फेरे, सोबतीने सोडुनी आली माहेर,
पत्नीला त्या देऊनी मान...,
साजरा करु द्वितीय दिन.....।।
मुलगी होताच घरी, आनंद वाहे ओसंडून उरी,
ठेऊनी तिचा अस्तित्वाची जाण...,
साजरा करु तृतीय दिन.....।।
मैत्रिणीने दिली आयुष्यात, सुंदर स्वप्ने रंगविण्या साथ,
आठवुनी तिच्या सोबतीचे क्षण...,
साजरा करु चतुर्थ दिन.....।।
लाडाची असे तुझी ताई, नेहमीच तुझ्या पाठीशी राही,
संकटातील आठवुनी साथ...,
साजरा करु पंचम दिन.....।।
सासु असते दुसरी आई, प्रेमाने लेकरु तिचे तुला देई,
त्यागाची तिच्या ठेऊनी आठवण...,
साजरा करु षष्ठी दिन.....।।
शाळेत लाभे गुरु म्हणुनी, मुर्तीस या घडविले जिने,
ज्ञानाचा तिच्या आदर करुनी...,
साजरा करू सप्तम दिन.....।।
पदोपदी प्रत्येक स्त्रीने, केलेल्या मदतीचे करुनी स्मरण,
आज तिला करुनी नमन...,
साजरा करु अष्टम दिन.....।।
स्त्रीला जो देईल मान, सुख दुःखात तिची ठेविल जाण,
करुनी भक्तीभावे वंदन...,
साजरा करू नवमी दिन.....।।
