STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

शिक्षणाचा बाजार

शिक्षणाचा बाजार

1 min
801


शिक्षणाच्या नावाखाली

कोणी बाजार मांडला

शाळा शुल्कापायी इथे

श्वास मुलांचा कोंडला।।१।।


साऱ्या पुस्तका पुरत्या

नीती अनितीच्या कथा

मुले होती असंस्कारी

कुणालाही नाही व्यथा।।२।।


संधी साधू मतलबी

जमवती गोतावळा

हित स्वतःचे पाहण्या

उघडती इथे शाळा।।३।।


झाले महाग शिक्षण

माय बाप भांबावती

पोटी चिमटा घेऊन

पैसा पैसा जमवती।।४।।


विद्यार्थ्यांच्या भारंभार

पैसे खर्चाला लागती

आयुष्याची जमा पुंजी

संस्था चालक लाटती।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy