STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

शिक्षक

शिक्षक

1 min
179

विद्यार्थीदशेत असताना शिकण्याची,

होती इच्छा अशी शिक्षक बनण्याची


शिक्षक होऊन खुर्चीवर आरामात बसावे,

मुलांच्या गंमती जमती पाहून मनात हसावे


लक्ष आपण ठेऊ साऱ्याच मुलांवर,

चूक दिसताच देऊ रट्टा त्याच्या पाठीवर


मिळेल आनंद हा शिक्षकी पेशाचा,

पडेल पाऊस पगाररुपी पैशाचा


स्वप्ने पाहिली होती मी भविष्याची,

पण राखरांगोळी झाली आयुष्याची


नको रे बाबा नोकरी शिक्षकाची,

परवडली त्यापेक्षा चाकरी हमालाची


भविष्याची दोरी नेहमीच शिक्षकांच्या हाती,

तरीही सर्व कामे असतात त्यांच्याच माथी


24X7 असतो कामकाजात व्यस्त,

नाही राहू शकत कधीच तो निर्धास्त


येतो प्रसंग कधी सुखाचा तर कधी दुःखाचा,

नाही विचार करत कोणी आमच्या मनाचा


नको रे बाबा नोकरी शिक्षकाची,

परवडली त्यापेक्षा चाकरी हमालाची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy