शिक्षक आमदार
शिक्षक आमदार
हात जोडूनी विनंती करतो
नेता शिक्षक पाहिजे आम्हांला
आमदार म्हणून शोभेल खरा
आमच्या समस्या सोडविण्याला
लढाऊ बाणा शिवबा सारखा
असावा त्यात खास गुण
न्याय देण्यास प्रामाणिक
असावे त्याचे निर्मळ मन
शिक्षकांची करून कहाणी
फक्त जाणेल शिक्षक
संधी एकदा देऊन
पहावी तोच रक्षक
रुसवे,फुगवे नको
आता पुन्हा आपल्यात
दुसराच फायदा घेतो
आपल्या साध्या मतभेदात
जात,धर्म,नको आम्हांला
न्याय देणारा हवा
शासन दरबारी आमच्या
मागण्या जिद्दीने मागणार असावा
खर्या कार्याचे मोल जाणावे
जागावे खाल्ल्या मिठास
बिनधास्त मत द्यावे आपण
पक्का विचार करून त्यास
आपल्यासाठी लढे ठरले
त्यांचे क्रांतीकारी
कुणास का घाबरावे
आपण आहोत सत्यविचारी
सर्व माणसात शिक्षक
आहे हुशार,चतुर
खोट्या आश्वासनाला
बळी नाही पडणार
नको लाच आम्हां कुणाची
आहे आमचा स्वाभिमान
सत्याच्या विजयासाठी
आम्ही करू मतदान
विसरू नये उपकार कुणाचे
वेळेला ठेवावी आठवण
आपल्याच स्वखर्चाने
जाऊन करावे मतदान
चांगल्या नेतृत्वाची ठेवावी जाण
शिक्षकांचे भविष्य घडण्यास
सर्वांनी यावे एक विचाराने
शिक्षण क्षेत्र पवित्र करण्यास
