शिक्षिका
शिक्षिका
सोप नसत हो घर सांभाळून नोकरी करण
घरातील टोमणे ऐकुन
ऑफिसमध्ये हसरा चेहरा ठेवन
पहाटे उठायच घर आवरायचं
लगबगीनं धावपळ करत शाळेत यायचं
नटणं तर दूरच केस सावरायला वेळ नसतो
गरम स्वयंपाक घरीच राहतो
केव्हा केव्हा रात्रीचा भात नशिबी येतो
गृहणी सोबत शिक्षिकेची भूमिका उत्तम पार पाडता
भावी पिढी घडवण्यात आपल कौशल्य पणाला लावता
जस घराला घरपण तुमच्यामुळे येत
शाळेला ही तेवढच महत्त्व तुमच्यामुळे लाभत
प्रत्येक समस्येच हसतमुखाने समाधान शोधन अवघड असत
घर आणि शाळेच काम पुर्ण करुन
उत्साहाने जगणं सोप नसत
आजारपण तर तुमच्या जवळही येत नाही
असं सर्वांना वाटत
मनातलं सारं काही तुमचं मनातच राहतं
