STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

4  

Ganesh Punde

Inspirational

शीर्षक :-.. निसर्गदेवता

शीर्षक :-.. निसर्गदेवता

1 min
269

हिरव्या निसर्गातून 

काही तरी शिकायचं

मातीतच जगायचं

मातीतच मरायचं


आई सम असते हो

जन्मलो ती माती

आपुलकीने जपावं

फक्त माणुसकीची नाती


निसर्ग तर जपतो आहे

सर्व सजीवांच लेणं

चुकवायचं आपल्याला

ते मरण्याआधी देणं


समतोलाने त्याच्या

चालते सारी सृष्टी

बदलून गेली फक्त

स्वार्थी मानवी दृष्टी


आई आणि मातीला हल्ली 

जपत नाही कोणी

निसर्ग ही कोपला आहे

होते आहे मोठी हाणी


फळ फुल नाहीत म्हणून

कोणी वृक्ष नका तोडू

झाडे लावू झाडे जगवू

निसर्गाशी नाते जोडू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational