शिदोरी
शिदोरी
सुखी समाधानी हवी
बालपणीची शिदोरी
खरी आनंदी वंदावी
निर निराळी शिदोरी।।धृ।।
केली दुधाची ती पोळी
होई दशम्या नव्हाळी।
गावी निघाला श्री हरी
त्याचे संगे ती शिदोरी।।१।।
गोप गोपिकांचा मेळा
झाले नातू नातं गोळा ।
संस्काराची ही शिदोरी
पुरते आयुष्य - भरी।।२।।
थोरं जरी माय बाप
मयाळू असावे खूप।
तसे काका काकू आजी
आबा आणि बाकी नाती।।३।।
असे असावे गुरुजी
दुसरे साने गुरुजी।
तावून तापून भरी
विद्यार्थी दशा शिदोरी।।४।।
पुढे भविष्य शिदोरी
दोन्ही घर ती उध्दारी।
सासर माहेर जरी
भाग्यलक्ष्मी तीच खरी।।५।।
वाचा पुस्तकाच्या हारी
मुखी पांडुरंग हरी।
जन्मोजन्मी लाभो देवा
कृपा शिदोरीचा मेवा।।६।।
निसर्ग ही करी कृपा
उन्ह पावसाचा खोपा।
नदी वाहे खळखळ
अखंड पाण्याचं जाळं।।७।।
सुखी समाधानी बावा
निसर्ग शिदोरी ठेवा ।
जिथे तिथे शोधा देवा
असे शिदोरीचा दावा।।८।।
