STORYMIRROR

Anupama TawarRokade

Children Stories

3  

Anupama TawarRokade

Children Stories

वाहतो फुले

वाहतो फुले

1 min
407

आई!

वेगवेगळ्या फुलांची किती ग गंमत

वेगवेगळ्या रंगाची फुलास चढते ग रगंत

वेगवेगळ्या आकाराची किती सुंदर ही फुले

लहान मोठी छोटी झाडावरी ही डुले


आई!

छोटी छोटी नाजुक जाई जुईची फुले

चंपा चमेली काटेकरवंटी सुगंधी पानांत झुले

गुलाब चाफा असो पारीजातक मोहक

चांदणी अबोली असो सदाफुली वेधक


आई!

कृष्ण, ब्रह्म वा चिखलातले कमळ उमले 

मधुमालती गोकर्ण असो मंजीरी गोजीरी खुले

मोगरा शेवंती निशीगंधा गजऱ्यात सजल्या

रातराणी तगर असो कन्हेर प्रेमात भिजल्या


आई!

तुझ्या चरणी मी फुले वाहतो सारी

या फुलांची सजली गंमत ही न्यारी

मी रचली तुजसाठी फुलांची रांगोळी 

तुच आहेस मजसाठी देवाची रुपे आगळी


Rate this content
Log in