वाट बघणं
वाट बघणं
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
झाली वेळ सायंकाळ
डोळे वाटेकडे लागती
दिस निघाला मावळाया
काम कधी संपेल तुझे आई
नभ दाटूनिया आले
विजा कडाडती त्यात
जसे गडगडे ढगांमध्ये
मन घाबरते आत
नाही सोबतीला कोणी
धीर दिला मुक्या जिवानं
ये गं लवकर आई
वाट संपूदे बघनं
भूक पोटात लागली
नाही ठेवल खाया मागं
आणलीस का गं मला
तुझ्या कष्टाची भाकर